भाजपच्या माजी आमदाराच्या अडचणीत वाढ; सामूहिक अत्याचार प्रकरणी अटकपूर्व जामीन जिल्हा सत्र न्यायालयाने फेटाळला..

माजी आमदार नरेंद्र पवार यांच्यावर सामूहिक बलात्काराचा गुन्हा दाखल झाल्यापासून गेल्या १३ दिवसापासून पोलिसांची सहा पथके त्यांच्यासह या गुन्ह्यातील दुसरा आरोपी बडतर्फ पोलीस कर्मचारी शैलेश पाटील या दोघांचा शोध घेत असतानाच सोमवारी भिवंडी जिल्हा सत्र न्यायालयाने माजी आमदार नरेंद्र पवार यांचा अटक पूर्व जामीन फेटाळला..

माजी आमदार नरेंद्र पवार हे पोलिसांच्या हाती अद्यापही सापडले नसल्याने पोलिसांच्या तपासावर प्रश्न चिन्ह निर्माण झाले आहे.

भिवंडी तालुक्यातील पडघा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका रेस्ट हाऊसमध्ये सामूहिक अत्याचार प्रकरणी दाखल गुन्ह्यात माजी आमदार नरेंद्र पवार यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर न्यायालयाने २४ तारखेला निर्णय राखून ठेवला होता. पडघा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रेस्ट हाऊसमध्ये एका विवाहितेवर केलेल्या सामूहिक अत्याचार प्रकरणी माजी आमदार नरेंद्र पवार व शैलेश पाटील यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला. हे दोन्ही आरोपी फरार असून नरेंद्र पवार यांनी भिवंडीतील अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी दाखल केलेल्या अर्जावर यापूर्वी न्यायाधीश ए. ए. कारंडे यांच्या न्यायालयात नुकतीच सुनावणी घेण्यात आली होती. त्यावेळी तपासी अंमलदार सहाय्यक पोलिस निरीक्षक दीपाली लंभाते व पीडित महिला उपस्थित होते.

या दोन्ही पक्षाच्या भूमिका ऐकून घेतल्यानंतर न्यायालयाने यावरील निर्णय राखून ठेवत असल्याचे गेल्या तारखेला निर्णय दिला होता. राखून ठेवलेल्या निर्णयावर २८ सप्टेंबर रोजी न्यायाधीश ए ए कारंडे यांच्या न्यायालयाने माजी आमदार नरेंद्र पवार यांचा अटक पूर्व जामीन फेटाळला आहे.

46
Get In Touch

Dombivli

+91 9967872052

shabda.khadag@gmail.com

Follow Us
लोकप्रिय बातम्या

Shabda Khadag © 2026. All Rights Reserved.

Developed By Vighnesh Technologies.