उल्हासनगरच्या महापौर अश्विनी निकम यांच्या पतीला धमकी.. भाजप-शिवसेना संघर्ष चिघळला; पोलिसांचा बंदोबस्त..

भाजप आणि शिवसेनेतील राजकीय संघर्षाला आता धमकीच्या वक्तव्यामुळे गंभीर वळण मिळाले आहे. महापौर अश्विनी निकम यांचे पती कमलेश निकम यांना भाजपच्या पदाधिकाऱ्यांकडून ‘भेटेल तिथे फटके देणार’ असा इशारा देण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे..

उल्हासनगर : भाजप आणि शिवसेनेतील राजकीय संघर्षाला आता धमकीच्या वक्तव्यामुळे गंभीर वळण मिळाले आहे. महापौर अश्विनी निकम यांचे पती कमलेश निकम यांना भाजपच्या पदाधिकाऱ्यांकडून ‘भेटेल तिथे फटके देणार’ असा इशारा देण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. या पार्श्वभूमीवर रविवारी मध्यरात्री काही व्यक्ती निकम यांच्या निवासस्थानाजवळ जमल्याने उल्हासनगरात तणाव निर्माण झाला. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत सुरक्षेच्या दृष्टीने बंदोबस्त वाढविला.

भाजपने शनिवारी शिवसेनेसोबतची युती तोडण्याची घोषणा करत खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, कमलेश निकम, पप्पू कलानी आणि ओमी कलानी यांच्यावर विविध आरोप केले होते. त्यानंतर शिवसेनेची भूमिका मांडताना कमलेश निकम यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्याबाबत वादग्रस्त आरोप केल्याचे सांगितले जात आहे. या आरोपांची स्वतंत्रपणे पुष्टी झालेली नाही.

निकम यांच्या वक्तव्यानंतर भाजप पदाधिकाऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. भाजप पदाधिकारी कपिल अडसूळ आणि मनीष हिंगोरानी यांनी सोशल मीडियावर व्हिडिओ प्रसारित करून निकम यांच्या वक्तव्यावर आक्षेप घेतला. याच व्हिडिओमध्ये निकम यांना ‘भेटेल तिथे फटके देणार’, असा इशारा देण्यात आल्याचा आरोप आहे.

व्हिडीओ समोर आल्यानंतर रात्री काही व्यक्ती निकम यांच्या निवासस्थानाजवळ जमा झाल्याची माहिती मिळाली. त्यानंतर शिवसेनेचे नगरसेवक आणि पदाधिकारीही त्यांच्या निवासस्थानाबाहेर दाखल झाले.

41
Get In Touch

Dombivli

+91 9967872052

shabda.khadag@gmail.com

Follow Us
लोकप्रिय बातम्या

Shabda Khadag © 2026. All Rights Reserved.

Developed By Vighnesh Technologies.