नालेसफाई कामात लहान मुलांना वापरून त्यांच्या जीवाशी खेळणाऱ्या कंत्राटदारांवर गुन्हे निंदविण्याची मागणी..

 उल्हासनगर येथील राजीव गांधी नगरातील घटना.. 

येथील मोठ्या नाल्यात अल्पवयीन मुलांना उतरवून गाळ काढण्याचे काम करून घेतले जात असल्याचे समोर आले असून, पोकलेन मशीनच्या बकेटवर मुलांना बसवून गोलाकार फिरवल्याचे व्हिडीओ समोर आल्यानंतर या प्रकाराने खळबळ उडाली आहे. या प्रकरणी संबंधित कंत्राटदार आणि जबाबदार अधिकाऱ्यांना निलंबित करण्याची मागणी युवासेनेकडून करण्यात आली आहे. प्रभाग क्रमांक ३ अंतर्गत सुरू असलेले नालेसफाईचे काम शुभम कन्स्ट्रक्शन या कंपनीमार्फत करण्यात येत आहे. पोकलेन मशीनच्या सहाय्याने सुरू असलेल्या या कामादरम्यान अल्पवयीन मुलांना थेट नाल्यात उतरवून कचरा पोकलेनच्या बकेटमध्ये भरण्याचे काम करून घेतले जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे.

याप्रकरणी युवासेनेचे कल्याण जिल्हा सचिव हरजिंदरसिंह भुल्लर यांनी महापालिका आयुक्त, पोलीस उपायुक्त आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांच्याकडे लेखी तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणी संबंधित कंत्राटदार, पोकलेन चालक तसेच महापालिकेचे स्वच्छता निरीक्षक आणि संबंधित अधिकाऱ्यांना तत्काळ निलंबित करून विभागीय चौकशी करण्यात यावी, अशी मागणी हरजिंदरसिंह भुल्लर यांनी केली आहे.

56
Get In Touch

Dombivli

+91 9967872052

contact@shabdakhadag.in

Follow Us
लोकप्रिय बातम्या

Shabda Khadag © 2026. All Rights Reserved.

Developed By Vighnesh Technologies.