गॅस सिलिंडरच्या कमतरतेमुळे इलेक्ट्रिक इंडक्शन आणि स्टोव्हची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे..

डोंबिवली: इस्रायल-अमेरिका-इराण युद्धाच्या पार्श्वभूमीवर गॅसचा तुटवडा असून, लोक सरकारवर नाराज आहेत. शहरात गॅससाठी नोंदणी केली तरी, २५ दिवसांनी आणि गावांमध्ये ४५ दिवसांनी गॅस मिळतो. ज्यांचे कुटुंब एकत्र किंवा मोठे आहे, ते वाट पाहत आहेत..

काळाबाजार रोखण्यासाठी पोलीस, गॅस अधिकारी आणि काही सामाजिक कार्यकर्ते यावर लक्ष ठेवून आहेत. गॅस येईल असे सरकार सांगत असले तरी, त्यांनी प्रति गॅस ६० रुपयांनी दर वाढवला आहे. गॅस एजन्सीबाहेर लोकांच्या लांबच लांब रांगा दिसत आहेत. ठीक आहे, क्षणभरासाठी आपण सरकारला मदत करू असे मानूया. पण, जर गॅस संपला आणि पंधरा दिवसांत उपलब्ध झाला नाही, तर सरकार अन्नधान्याच्या पेट्या देईल का, असे काही डोंबिवलीतील महिलांनी गंभीर स्वरात संतापाने विचारले. गरीब असो वा मध्यमवर्गीय, गॅसच्या तुटवड्यामुळे सर्वच लोक त्रस्त आहेत. पर्याय उपलब्ध व्हावा आणि उपाशी राहू नये, यासाठी डोंबिवली, मुंबई, कल्याण आणि इतर मोठ्या शहरांमधील लोकांनी इलेक्ट्रिक इंडक्शन ग्रिल आणि स्टोव्हची मागणी वाढवली आहे. दुसरा पर्याय नसल्यामुळे, लोक आपल्या ऐपतीनुसार ही उपकरणे खरेदी करत आहेत. या उपकरणांच्या दुकानांमधील गर्दीही वाढली असून, येथील साठा सतत संपत आहे. शहरात लाकूड उपलब्ध नसल्यामुळे लोक सहसा स्टोव्ह पेटवत नाहीत. याशिवाय, रॉकेलही सर्वांना मिळत नाही. आता लोकांचा संयम संपण्यापूर्वी केंद्र आणि राज्य सरकारांनी काही उपाययोजना कराव्यात, अशी मागणी ते करत आहेत. ही विद्युत उपकरणे ५०० ते ५००० रुपयांपर्यंतच्या किमतीत विकली जात आहेत. लोकांचे म्हणणे आहे की, या उपकरणांमुळे विजेचे बिल वाढले तरी चालेल, पण उपाशी राहण्यापेक्षा काहीतरी तोडगा काढला पाहिजे.

- प्रा. दिपक जाधव. संपादक शब्द खड्ग डिजिटल वृत्तपत्र..

116
Get In Touch

Dombivli

+91 9967872052

contact@shabdakhadag.in

Follow Us
लोकप्रिय बातम्या

Shabda Khadag © 2026. All Rights Reserved.

Developed By Vighnesh Technologies.