व्यावसायिक गॅस सिलिंडरचा काळाबाजार; हॉटेल व्यावसायिकांची कारवाईची मागणी..

मध्यपूर्व प्रदेशात सुरू असलेल्या तणावाचे चटके आता स्थानिक पातळीवरही जाणवू लागले असून त्याचा फटका ठाण्यातील हॉटेल व्यवसायाला बसत आहे. व्यावसायिक गॅस सिलिंडरची टंचाई निर्माण झाल्याने बाजारातून सिलिंडर गायब होत असल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. या टंचाईचा गैरफायदा घेत काहीजण व्यावसायिक गॅस सिलिंडरचा काळाबाजार करत असल्याचा आरोप ठाण्यातील हॉटेल व्यावसायिकांनी केला आहे..

सुमारे १,८०० रुपयांना मिळणारा व्यावसायिक गॅस सिलिंडर काळ्या बाजारात ४ ते ५ हजार रुपयांना विकला जात असल्याचा दावा ठाणे हॉटेल असोसिएशनने केला आहे.

यासंदर्भात ठाणे हॉटेल असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषद घेऊन सरकारने तातडीने हस्तक्षेप करून काळ्या बाजारावर नियंत्रण आणावे, अशी मागणी केली.

खाद्य व्यावसायिकांना फटका

अखत्यारीतील युद्धस्थिती कायम राहिल्यास ठाणे-मुंबई परिसरात येणारे पर्यटक, व्यावसायिक, आयटी कर्मचारी तसेच कामगार यांनाही अन्नपुरवठ्याबाबत अडचणी निर्माण होऊ शकतात. ठाणे शहरात सुमारे १,२०० हॉटेल्स कार्यरत असून लहान-मोठ्या खाद्य व्यावसायिकांची संख्या पाच हजारांपेक्षा जास्त आहे. गॅस टंचाई वाढल्यास वडापावसारख्या छोट्या खाद्यपदार्थांच्या टपऱ्यांनाही फटका बसण्याची शक्यता असल्याचेही संघटनेने सांगितले.

38
Get In Touch

Dombivli

+91 9967872052

contact@shabdakhadag.in

Follow Us
लोकप्रिय बातम्या

Shabda Khadag © 2026. All Rights Reserved.

Developed By Vighnesh Technologies.