यामध्ये त्यांच्यासोबत दहीहंडी मंडळांचे अध्यक्ष आणि आयोजकांचाही समावेश आहे..
या संदर्भातील महत्त्वाची माहिती खालीलप्रमाणे आहे:सुरुवातीची कारवाई: सर्वात आधी परवानगीशिवाय आणि अटींचे उल्लंघन करून लावणी कार्यक्रम आयोजित केल्याप्रकरणी प्रसिद्ध नृत्यांगना राधा पाटील यांच्यासह मंडळाच्या अध्यक्षांवर बिबवेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता.
कारवाई: त्यानंतर सहकारनगर पोलिसांनी मंचावर अश्लील हावभाव आणि नृत्य केल्याप्रकरणी डान्सर निशा मुंबईकर, शुभांगी थोरात यांच्यासह आणखी ८ नृत्यांगनांवर गुन्हा दाखल केला आहे.
इतर गुन्हे: आवाजाची मर्यादा ओलांडून डीजे वाजवल्यामुळे पुणे पोलिसांनी १० दहीहंडी मंडळांवर गुन्हे दाखल केले असून ११६ मंडळांवर न्यायालयीन खटले भरले आहेत.
ठाणे महानगरपालिकेच्या भाजप माजी नगरसेविका मृणाल पेंडसे यांनी ही तक्रार दाखल केली आहे. त्यांनी केवळ गौतमीच नाही, तर कार्यक्रमाच्या आयोजकांवरही गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे
शब्द खड्ग ने या संदर्भात सर्वसामान्य माता भगिनी आणि जाणत्या पुरुष मंडळींना विचारले असता असले अश्लील नृत्य करणाऱ्या नृत्यांगना आणि त्यांचे आयोजक या सर्वांवर समाजाने बंदी घालावी अशी रोखठोक मते येऊ लागली. तमाशा, भारूड, कथक , कुचिपुडी सारख्या चांगल्या लोककलांना कधीच इतक्या हीन नजरेने अपवाद वगळता कुणी पहिले नाही. मात्र, आजच्या दहीहंडी सारख्या उत्सवांत नाचणाऱ्या नृत्यांगना अश्लील नृत्य आणि हावभाव करीत असल्याने या सर्व चावट गोष्टींना प्राध्यान्य देणाऱ्या मंडळींवर कडक कारवाई व्हावी अशी लोकांची मागणी आहे..
- प्रा. दिपक जाधव. संपादक शब्द खड्ग डिजिटल वृत्तपत्र..
Shabda Khadag © 2026. All Rights Reserved.
Developed By Vighnesh Technologies.