सीजेपीचे अभिजीत दिपके यांनी केलेल्या आवाहनाला पाठिंबा ...तर पुणे शहर ठप्प होईल; आमदार रोहित पवार यांचा इशारा..

यावेळी विद्यार्थ्यांच्या आक्रमक भूमिकेनुसार संपूर्ण पुणे शहर पूर्णपणे ठप्प होऊ शकते, असा थेट इशारा आमदार रोहित पवार यांनी सोमवारी दिला..

पुणे : सीजेपीचे अभिजीत दिपके यांनी केलेल्या आवाहनाला पाठिंबा देत आणि विद्यार्थ्यांच्या आक्रमक भूमिकेनुसार संपूर्ण पुणे शहर पूर्णपणे ठप्प होऊ शकते, असा थेट इशारा आमदार रोहित पवार यांनी सोमवारी दिला.

येत्या ७ किंवा ८ ऑक्टोबर रोजी काँग्रेस नेते राहुल गांधी पुण्यात येण्याची शक्यता असून, त्या दिवशी जवळपास १ लाख विद्यार्थी रस्त्यावर उतरतील, असा दावा त्यांनी केला. हे आंदोलक विद्यार्थी एकतर संपूर्ण पुणे शहर बंद करतील किंवा थेट मुंबईत जाऊन मंत्रालयावर धडक देतील, असे स्पष्ट करत पवारांनी राज्य सरकारला याप्रकरणी तोडगा काढण्यासाठी दोन दिवसांचा अल्टीमेटम दिला आहे.

विद्यार्थ्यांची मूळ इच्छा ही अभ्यास करण्याची आणि आपल्या परीक्षांवर लक्ष केंद्रित करण्याची आहे, परंतु दुर्दैवाने राज्य सरकार स्वतःच एक वेगळे आंदोलन उभे करत आहे.

विद्यार्थ्यांच्या या न्याय्य आंदोलनाला तडा देण्यासाठी सत्ताधाऱ्यांकडून केले जाणारे प्रयत्न अत्यंत अयोग्य आहेत. एमपीएससी संदर्भात बोलताना पवार म्हणाले की, एमपीएससी आयोग पूर्णपणे बर्खास्त करून कोणताच प्रश्न सुटणार नाही. त्याऐवजी संशयित सदस्यांना निलंबित करून त्या ठिकाणी काही निष्कलंक व चांगले अधिकारी आणता येतील, असा पर्याय आम्ही सरकारला दिला आहे.

दरम्यान, भाजप नेते आणि मंत्री नितेश राणे यांच्यावरही रोहित पवारांनी जोरदार पलटवार केला. राणे हे माझे मित्र असले तरी, मला कॅबिनेट मंत्रिपदाची ऑफर देण्यापेक्षा त्यांनी आंदोलक विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्यांचे प्रलंबित प्रश्न सोडवावेत, असा सल्ला पवारांनी दिला.

राज्यभरात सरकारविरोधात असंतोषाचे वातावरण पेटल्याने सत्ताधाऱ्यांना आता आगामी काळात विरोधी पक्षांचे सरकार येणार असल्याची जाणीव झाली आहे, म्हणूनच ते एकत्र काम करण्याबाबत बोलत आहेत.

नितेश राणेंनी धाडस दाखवून भाजप सोडत विरोधी बाकांवर बसावे; जेव्हा आमची सत्ता येईल, तेव्हा आपण सोबतीने काम करू. नितेश राणे भविष्यात भाजपमध्ये टिकणार नाहीत, ते भाजप सोडतील आणि आमच्यासोबत आले तर आपण एकत्र मंत्री म्हणून राहू शकतो, असा दावा त्यांनी केला.

50
Get In Touch

Dombivli

+91 9967872052

shabda.khadag@gmail.com

Follow Us
लोकप्रिय बातम्या

Shabda Khadag © 2026. All Rights Reserved.

Developed By Vighnesh Technologies.