पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीची जय्यत तयारी; १० हजार पोलिसांचा बंदोबस्त, दोन हजार सीसीटीव्हींची नजर..

गेल्या दहा-बारा दिवसांपासून उत्साहात साजरा झालेल्या गणेशोत्सवाची सांगता आता वैभवशाली विसर्जन मिरवणुकीने होणार आहे. अनंत चतुर्दशीला शुक्रवार, २५ सप्टेंबर रोजी सकाळी साडेदहा वाजता मंडईतील लोकमान्य टिळक पुतळ्यापासून विसर्जन मिरवणुकीला सुरुवात होणार आहे..

पुणे : गेल्या दहा-बारा दिवसांपासून उत्साहात साजरा झालेल्या गणेशोत्सवाची सांगता आता वैभवशाली विसर्जन मिरवणुकीने होणार आहे. अनंत चतुर्दशीला शुक्रवार, २५ सप्टेंबर रोजी सकाळी साडेदहा वाजता मंडईतील लोकमान्य टिळक पुतळ्यापासून विसर्जन मिरवणुकीला सुरुवात होणार आहे. गणरायाला भावपूर्ण निरोप देण्यासाठी गणेश मंडळांचे कार्यकर्ते सज्ज झाले असून, पोलिसांनीही सुरक्षेच्या दृष्टीने जय्यत तयारी केली आहे.

मिरवणूक सुरक्षित आणि शिस्तबद्ध वातावरणात पार पाडण्यासाठी शहरात सुमारे १० हजार पोलीस अधिकारी, कर्मचारी आणि सुरक्षा यंत्रणा तैनात करण्यात आली आहे. यामध्ये चार अपर पोलीस आयुक्त, १४ पोलीस उपायुक्त, ३५ सहायक पोलीस आयुक्त, १५४ पोलीस निरीक्षक, ६७५ पोलीस उपनिरीक्षक आणि सुमारे सात हजार पोलीस अंमलदारांचा समावेश आहे. याशिवाय एसआरपीएफच्या दोन कंपन्या, ९०० होमगार्ड, १२ क्यूआरटी आणि २१ राईट कंट्रोल पथके तैनात करण्यात आली आहेत.

ढोल-ताशा पथकांना १५ मिनिटांची मर्यादा

यंदा ढोल-ताशा पथकांतील वादकांच्या संख्येवर बंधन नसले, तरी एका चौकात पथकाला १५ मिनिटांपेक्षा अधिक वेळ थांबता येणार नाही. प्रत्येक मंडळाने दोनपेक्षा अधिक पथके ठेवू नयेत, याबाबत मंडळांशी चर्चा करण्यात आली आहे. टोल, प्रेशर हॉर्न, लेझर लाईट आणि प्लाझ्मावर बंदी असून, ध्वनीमर्यादेचे उल्लंघन करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे. ध्वनीपातळी तपासण्यासाठी ११२ पथके नियुक्त करण्यात आली आहेत.

41
Get In Touch

Dombivli

+91 9967872052

shabda.khadag@gmail.com

Follow Us
लोकप्रिय बातम्या

Shabda Khadag © 2026. All Rights Reserved.

Developed By Vighnesh Technologies.