माजी महसूल राज्यमंत्री मदन बाफना यांचे निधन, राजकीय नेत्यांकडून श्रद्धांजली अर्पण..

"आमचे सहकारी मदन शेठ, जे आमच्या सर्वांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले, ते आज आपल्यात नाहीत..." अशा शब्दांत ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या..

पुणे : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, मावळ विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार तथा माजी महसूल व परिवहन राज्यमंत्री ॲड. मदन बाफना यांचे वयाच्या ८५ व्या वर्षी दीर्घ आजाराने सोमवारी (दि. १४) निधन झाले. त्यांच्या निधनाने मावळसह पुणे जिल्ह्याच्या राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात शोककळा पसरली आहे. आमदार तसेच मंत्री म्हणून त्यांनी केलेल्या कार्याचा ठसा मावळच्या राजकारणावर उमटला होता. सर्वसामान्य नागरिक, कार्यकर्ते आणि विविध क्षेत्रांतील मान्यवरांशी त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध होते. बाफना यांच्या निधनाने महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात हळहळ व्यक्त होत असून विविध राजकीय नेत्यांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.

आमचे सहकारी आज आमच्यात नाहीत - ज्येष्ठ नेते शरद पवार

ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, "आमचे सहकारी मदन शेठ, जे आमच्या सर्वांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले, ते आज आपल्यात नाहीत. वीस वर्षांपूर्वी, महाविकास आघाडीच्या निर्णयांच्या निमित्ताने ते आमच्याशी जोडले गेले. ते अभियांत्रिकीचे शिक्षण घेण्यासाठी पुण्यात आले होते आणि त्याच काळात माझी मदन शेठ यांच्याशी भेट झाली. त्यांच्या अखेरच्या दिवसांपर्यंत आमची सोबत कायम होती."

44
Get In Touch

Dombivli

+91 9967872052

shabda.khadag@gmail.com

Follow Us
लोकप्रिय बातम्या

Shabda Khadag © 2026. All Rights Reserved.

Developed By Vighnesh Technologies.