वाडा तालुक्यातील पाली गावाजवळ असलेल्या रबर कारखान्यातील भिंत कोसळून झालेल्या दुर्घटनेमध्ये तीन कामगारांचा दुर्दैवी मृत्यू झाला..
पालघर : वाडा तालुक्यातील पाली गावाजवळ असलेल्या रबर कारखान्यातील भिंत कोसळून झालेल्या दुर्घटनेमध्ये तीन कामगारांचा दुर्दैवी मृत्यू झाला. वाडा तालुक्यातील पाली गावाजवळ विक्रमगड रस्त्यावर टिना रबर कारखाना असून या कारखान्यातील कामगार गुरुवारी सकाळी १०च्या सुमारास नाश्ता करीत असताना कारखान्यातील साहित्य साठवणूक करण्यात येणाऱ्या गोदामाची भिंत त्यांच्यावर कोसळली.
या दुर्घटनेमध्ये भिंतीखाली गाडले जाऊन केशव वालकू गुनगुणा (५५), मीरा जानू गवळी (६०) आणि रंजना दिलीप कोंब (३५) या तीन कामगारांचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकारी, महसूल विभाग अधिकारी आणि अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. तीन ही कामगारांचे मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आले असून या प्रकरणी वाडा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
Shabda Khadag © 2026. All Rights Reserved.
Developed By Vighnesh Technologies.