येवला तालुक्यातील विखरणी येथील ग्रामपंचायत कार्यालयात गेल्या १६ वर्षापासून हिंदू-मुस्लिम बांधवांसह एकत्र सुरु असलेली सार्वजनिक लक्ष्मीपूजनाची परंपरा यंदा ग्रामपंचायतचा कारभार शासन नियुक्त प्रशासकाकडे असतानाही उत्साहात कायम ठेवली..
येवला पंचायत समितीचे माजी गटनेते मोहन शेलार यांच्या संकल्पनेतून २०१० मध्ये या परंपरेचा प्रारंभ झाला. तो आजही सुरू आहे. ग्रामपंचायत ही केवळ सरपंच, उपसरपंच अथवा सदस्यांची नसून संपूर्ण गावाची आहे, ही भावना प्रत्येकाच्या मनात रुजावी या उद्देशाने सार्वजनिक लक्ष्मी पूजन सुरू करण्यात आले. दरवर्षी लक्ष्मीपूजनाच्या दिवशी सकाळी नऊ वाजता ग्रामपंचायत कार्यालयात ग्रामस्थ एकत्र येतात ग्रामपंचायतचे चेकबुक, घरपट्टी व पाणीपट्टी पावती पुस्तकाचे विधिवत पूजन केले जाते.
लक्ष्मीपूजनाच्या पूर्वसंध्येला फुल बाजारात झेंडूच्या फुलाला मोठी मागणी होती. ठाणे मुंबईसह परराज्यातील व्यापाऱ्यांनी नाशिकच्या बाजारात हजेरी लावत फुलांची रात्री उशिरा पर्यंत खरेदी केली होती. फुलांच्या प्रतवारीनुसार १०० ते १५० तर चांगल्या प्रतीच्या फुलांना १५०ते २५० रुपये प्रति क्रेट्स दर मिळाला.
Shabda Khadag © 2026. All Rights Reserved.
Developed By Vighnesh Technologies.