ऐरोली येथे क्रेन कोसळून दोघा कामगारांचा मृत्यू ..

ऐरोली येथील पटणी रोड येथे बांधकाम सुरू असलेल्या बांधकाम साइटवरील बांधकाम साहित्य वाहून नेणाऱ्या क्रेनचा हुक तुटून तो खाली काम करणाऱ्या दोन कामगारांवर पडल्याची दुर्घटना सोमवारी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास घडली.

नवी मुंबई : ऐरोली येथील पटणी रोड येथे बांधकाम सुरू असलेल्या बांधकाम साइटवरील बांधकाम साहित्य वाहून नेणाऱ्या क्रेनचा हुक तुटून तो खाली काम करणाऱ्या दोन कामगारांवर पडल्याची दुर्घटना सोमवारी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास घडली. या दुर्घटनेत दोन्ही कामगारांचा दुर्दैवी मृत्यू झाला.

पटणी रोडवरील रहेजा बिल्डरच्या गीगा फ्लेक्स कंपनीच्या वतीने इमारतीचे बांधकाम सुरू आहे. सोमवारी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास या बांधकाम साइटवरील बांधकाम साहित्य वाहून नेणाऱ्या क्रेनचा हुक अचानक तुटला. त्यामुळे ही क्रेन तुटून खाली काम करत असलेल्या बॉबी राय (४१) व राहुल मिश्रा (३३) यावर कोसळला. या दुर्घटनेत दोन्ही कामगार गंभीर जखमी झाल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, तोपर्यंत त्यांचा मृत्यू झाला.

सीसीटीव्ही तपासले जात आहेत

दुर्घटनेची माहिती मिळताच रबाळे पोलिसांनी तसेच ऐरोली येथील महापालिका अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला.

22
Get In Touch

Dombivli

+91 9967872052

contact@shabdakhadag.in

Follow Us
लोकप्रिय बातम्या

Shabda Khadag © 2026. All Rights Reserved.

Developed By Vighnesh Technologies.