नवी मुंबई : राज्यात सध्या निर्माण झालेली दुष्काळी परिस्थिती, पावसाचा लपंडाव आणि अपुऱ्या पाण्यामुळे भाजीपाल्याचा पुरवठा कमी झाला आहे. त्यामुळे भाजीपाल्याच्या दरात मोठी वाढ झाली आहे. पितृपक्षामुळे नैवेद्यासाठी लागणाऱ्या पालेभाज्या आणि फळभाज्यांच्या मागणीत अचानक वाढ झाली आहे, ज्यामुळे सर्वसामान्य नागरिकांच्या खिशाला मोठा फटका बसत आहे..
दुष्काळामुळे आवक घटल्याने आणि पितृपक्षाच्या मागणीमुळे किरकोळ बाजारात भाज्यांचे भाव वधारले आहेत. किरकोळ बाजारात पालक प्रति जुडी ४० रुपये तर मेथीच्या पानांची जुडी ३० रुपयांवर पोहोचली आहे. नैवेद्यासाठी आणि धार्मिक कार्यासाठी लागणाऱ्या फळभाज्यांच्या (टोमॅटो, भेंडी, गवार, कारले) किंमतीतही १५ ते २० टक्क्यांची वाढ झाली आहे.
Shabda Khadag © 2026. All Rights Reserved.
Developed By Vighnesh Technologies.