भाजप नेते विजय चौधरींना अटक; महिला नेत्यांबद्दल आक्षेपार्ह भाषा भोवली..

भाजपाचे उत्तर महाराष्ट्र संयोजक विजय चौधरी आणि मंत्री गिरीश महाजन यांची धक्कादायक ऑडिओ..

नाशिक : भाजपाचे उत्तर महाराष्ट्र संयोजक विजय चौधरी आणि मंत्री गिरीश महाजन यांची धक्कादायक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली. ज्यानंतर खळबळ उडाली आहे. विजय चौधरी हे माजी खासदार हिना गावित, रक्षा खडसे यांच्याबद्दल आक्षेपार्ह भाषा वापरताना दिसले. याप्रकरणी डॉ. हिना गावित यांच्या भावाकडून विजय चौधरी यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. त्यामुळे विजय चौधरी यांना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडून अटक करण्यात आली. डॉ. हिना गावित यांच्याबाबतच्या कथित आक्षेपार्ह ऑडिओ क्लिप प्रकरणात ही कारवाई करण्यात आली. चौधरी यांच्याविरुद्ध ॲट्रॉसिटी आणि विनयभंगाचा गुन्हा नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला होता.

समाजमाध्यमात वाऱ्याच्या वेगाने पसरलेल्या कथित ध्वनीफितीत भाजपच्या माजी खासदार डॉ. हिना गावित यांच्याबाबत आक्षेपार्ह आणि जातीवाचक स्वरूपाची विधाने केल्याचा आरोप करत नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यासह विविध कलमान्वये विजय चौधरीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

फक्त रक्षा खडसेच नाही तर डॉ. हिना गावित यांच्याबद्दलची अपशब्द बोलतानाची त्यांची एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली. ज्यानंतर नंदुरबारच्या राजकारणात खळबळ उडाली. आता हे प्रकरण थेट पोलीस स्टेशनपर्यंत पोहोचले. रक्षा खडसे यांच्याबद्दल अपशब्द वापरल्यानंतरही त्यांनी कोणताही गुन्हा दाखल केला नाही.

59
Get In Touch

Dombivli

+91 9967872052

contact@shabdakhadag.in

Follow Us
लोकप्रिय बातम्या

Shabda Khadag © 2026. All Rights Reserved.

Developed By Vighnesh Technologies.