भोंदूबाबा अशोक खरात अटकेत; महिलेवर अत्याचारप्रकरणी २४ मार्चपर्यंत पोलीस कोठडी..

नाशिकमधील बहुचर्चित अशोक खरात उर्फ कॅप्टन या भोंदूगिरी करणाऱ्या मांत्रिकाला पोलिसांनी अटक केली आहे. या भोंदूबाबाला बुधवारी नाशिक जिल्हा न्यायालयात हजर करण्यात आले तेव्हा त्याला २४ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. या मांत्रिकाने गुंगीचे औषध देऊन एका महिलेवर बलात्कार केल्याप्रकरणी नाशिकच्या सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे..

महत्त्वाची बाब म्हणजे या भोंदूबाबाकडे अनेक राजकीय नेते, अधिकारी, सेलिब्रिटी आपले भविष्य जाणून घेण्यासाठी येत होते. त्यांचे व्हिडीओही पोलीस तपासात उघडकीस आले आहेत. सिन्नर तालुक्यात अशोक खरातने श्री शिवनिका संस्थान या मंदिराची स्थापना केलीं आहे, या मंदिराच्या विश्वस्त पदावर महिला आयोगाच्या अध्यक्ष रूपाली चाकणकर या आहेत, तर एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री असताना त्यांनीही या मंदिरात जाऊन दर्शन घेतले होते, तेव्हापासून अशोक खरात जास्त चर्चेत आला होता.

ऑफिसमध्येच महिलेशी केले अश्लील चाळे

अशोक खरात उर्फ कॅप्टन या भोंदूबाबाचे आणखी एक मोठे कांड पुढे आले आहे. या भोंदूबाबाने धार्मिक विधीच्या नावाखाली स्वतःच्या ऑफिसमध्येच एका महिलेशी अश्लील चाळे केल्याचा व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओत आधी हा भोंदूबाबा महिलेच्या डोक्यावर तांब्या ठेवून धार्मिक विधीचे ढोंग करतोय आणि त्यानंतर तिथेच महिलेशी गैरवर्तन करताना दिसत आहे. तो इतका निर्वावलेला आहे की, केबिनबाहेर लोक बसलेले असतानाही त्याला त्याची पर्वा नव्हती. हा व्हिडीओ २०२४ मधील असल्याचे सांगण्यात येत आहे. एका महिलेला पूजा करण्याच्या बहाण्याने गुंगीचे औषध देऊन तिच्यावर अत्याचार झाल्याची तक्रार नाशिकमध्ये करण्यात आली. त्यानंतर या प्रकरणी अशोक खरातवर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला सहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. विशेष म्हणजे २०२२ ते २०२४ या दरम्यान, अशोक खरातने आणखी किती महिलांना फसवले आहे याचा तपास सुरू आहे.

51
Get In Touch

Dombivli

+91 9967872052

contact@shabdakhadag.in

Follow Us
लोकप्रिय बातम्या

Shabda Khadag © 2026. All Rights Reserved.

Developed By Vighnesh Technologies.