अमली पदार्थाविरोधात ‘झिरो टॉलरन्स’ - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस..

यात सहभागी गुन्हेगारांची संपत्तीही होणार जप्त होणार..

नागपूर शहरातील मोतीबाग परिसरात अमली पदार्थ तस्करांविरोधात झालेल्या कारवाईच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकार अमली पदार्थाविरोधात ‘झिरो टॉलरन्स’ धोरण राबवणार आहे.

अमली पदार्थाच्या गुन्ह्यात थेट किंवा अप्रत्यक्ष सहभाग आढळणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांवर निलंबनाऐवजी थेट बडतर्फीची कारवाई केली जाणार असल्याचा पुनरुच्चारही त्यांनी केला.

मोतीबाग येथील अमली पदार्थ तस्करांच्या घरांवर छापे टाकून गांजा आणि अग्निशस्त्रांचा साठा जप्त करण्यात आल्याबाबत भाजपच्या प्रवीण दटके यांनी प्रश्न उपस्थित केला होता. यावेळी विचारण्यात आलेल्या प्रश्नाला उत्तर देताना फडणवीस यांनी अमली पदार्थांच्या विरोधात सरकारने कडक भूमिका घेतल्याचे सांगितले.

नागपुरात ऑपरेशन थंडर

नागपूर पोलिसांनी ‘ऑपरेशन थंडर’ अंतर्गत मोठ्या प्रमाणावर कारवाया करत गेल्या ११ महिन्यांत ९०७ गुन्हे उघडकीस आणले आहेत. या कारवायांमध्ये सुमारे १ हजार २५४ किलो अमली पदार्थ जप्त करण्यात आले असून त्यांची किंमत अंदाजे १० कोटी रुपये आहे. राज्यात अमली पदार्थविरोधातील कारवाई अधिक प्रभावी करण्यासाठी ३१ ऑगस्ट २०२३ रोजी अमली पदार्थविरोधी कृती दलाची स्थापन करण्यात आली आहे. केंद्र सरकार आणि इतर राज्यांशी समन्वय वाढवून इंटेलिजन्स शेअरिंग केल्यामुळे आंतरराज्य तसेच आंतरराष्ट्रीय अमली पदार्थांच्या जाळ्यावर कारवाई शक्य होत असल्याचे फडणवीस यांनी सांगितले.

37
Get In Touch

Dombivli

+91 9967872052

contact@shabdakhadag.in

Follow Us
लोकप्रिय बातम्या

Shabda Khadag © 2026. All Rights Reserved.

Developed By Vighnesh Technologies.