रेल्वे पोलीस आयुक्त डॉ. रवींद्र शिसवे यांच्या सूचनेनुसार एसीपी श्री. अरुण पोखरकर साहेबांच्या मार्गदर्शनाखाली डोंबिवली लोहमार्गचे इन्चार्ज श्री. किरण उंदरे साहेब यांनी सायबर व कायदा साक्षरता मोहीम डोंबिवलीतील विविध कॉलेजांत राबवायला सुरुवात केली आहे..
सविस्तर वृत्त असे की, सायबर फसवणूक व कायद्यातील बदलांबाबत जनजागृती करण्यासाठी रेल्वे पोलीस आयुक्त डॉ. रवींद्र शिसवे यांच्या संकल्पनेतून सायबर व कायदा साक्षरता मोहीम सुरु करण्यात आली आहे. या मोहिमेने अल्पावधीतच एक लाखाचा टप्पा पार केला आहे. यात सायबर फसवणुकीचे प्रकार, फसवणूक कशी केली जाते ती पद्धत, त्यापासून कसे वाचता येईल त्याचे मार्गदर्शन, फसवणूक झाल्यास काय करावे या सर्व माहितीचे संकलन करून एक अभ्यासक्रम तयार करण्यात आला होता. त्याचबरोबर ही परीक्षा देणाऱ्या मुंबई व परिसरातील ४० महाविद्यालयांतील पाच हजार विद्यार्थ्यांचा सायबर व कायदा साक्षरता संघ स्थापन करण्यात आला होता.
कल्याण-डोंबिवली लोहमार्ग विभागात एसीपी श्री अरुण पोखरकर साहेबांच्या मार्गदर्शनाखाली डोंबिवली लोहमार्गचे इन्चार्ज श्री. किरण उंदरे साहेबांनी डोंबिवली पूर्वेच्या प्रगती महाविद्यालयात तथा पश्चिमेच्या जोंधळे महाविद्यालयात जाऊन विद्यार्थ्यांमध्ये सायबर व कायदा साक्षरता मोहिमेचे महत्व पटवून देऊन अनेक विद्यार्थ्यांना या बाबत जागृत केलं आहे. उंदरे साहेबांच्या म्हणण्यानुसार आतापर्यंत डोंबिवलीतील पंधरा ते वीस हजार विद्यार्थ्यांनी या मोहिमेचा लाभ घेतला आहे. विविध कॉलेजांत जाऊन विद्यार्थ्यांचे गट करून त्यांना मार्गदर्शन करणे, सामूहिक मार्गदर्शन करणे आणि मार्गदर्शन केलेल्या विद्यार्थ्यांनी इतर विद्यार्थ्यांना या बाबतीत जागृत करणे असे या मोहिमेचे धोरण आहे. डोंबिवलीत उंदरे साहेब आणि त्यांची टीम करीत असलेल्या कामाचे जनसामान्य आणि कॉलेज वर्तुळातून अभिनंद केले जात आहे..
- प्रा. दिपक जाधव. संपादक शब्द खड्ग डिजिटल वृत्तपत्र..
Shabda Khadag © 2025. All Rights Reserved.
Developed By Vighnesh Technologies.