दातांमध्ये अडकलेले अन्नकण काढण्यासाठी सेफ्टी पिनचा वापर करणे एका १८ वर्षीय तरुणीच्या जीवावर बेतण्याची वेळ आली होती. दात स्वच्छ करताना चुकून सेफ्टी पिन गिळली गेल्याने ती अन्ननलिकेत अडकली..
जळगाव : दातांमध्ये अडकलेले अन्नकण काढण्यासाठी सेफ्टी पिनचा वापर करणे एका १८ वर्षीय तरुणीच्या जीवावर बेतण्याची वेळ आली होती. दात स्वच्छ करताना चुकून सेफ्टी पिन गिळली गेल्याने ती अन्ननलिकेत अडकली. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या (जीएमसी) कान, नाक व घसा विभागातील डॉक्टरांनी कौशल्यपूर्ण उपचार करून ही पिन यशस्वीरीत्या बाहेर काढली. या प्रक्रियेदरम्यान अन्ननलिकेला छिद्र पडणे, रक्तस्राव होणे किंवा श्वसनमार्गात वस्तू जाण्याचा धोका होता. त्यामुळे अत्यंत सावधगिरीने ही प्रक्रिया पूर्ण करण्यात आली.
महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. गिरीश ठाकूर आणि वैद्यकीय अधीक्षक डॉ. योगिता बावस्कर यांच्या मार्गदर्शनाखाली कान, नाक व घसा विभागप्रमुख डॉ. राजश्री चौरपगार, डॉ. अक्षय सरोदे, डॉ. ललित राणे यांच्यासह निवासी डॉक्टरांच्या पथकाने ही कामगिरी केली.
Shabda Khadag © 2026. All Rights Reserved.
Developed By Vighnesh Technologies.