जळगाव जिल्ह्यात रावेर, भुसावळ, चोपडा, यावलसह अनेक भागांत भूकंपाचा धक्का जाणवला. मध्य प्रदेशातील खरगोन परिसरात केंद्रबिंदू असून, ४.५ तीव्रतेची नोंद झाली..
जळगाव : जळगाव जिल्ह्यात शनिवारी (दि. १४) सकाळी अचानक भूकंपाचे धक्के जाणवल्याने नागरिकांमध्ये घबराट पसरली. सकाळी सव्वानऊच्या सुमारास रावेर, भुसावळ, मुक्ताईनगर, चोपडा आणि यावलसह अनेक भागांत जमिनीला हादरे बसले. अचानक घरातील वस्तू हलू लागल्याने अनेक नागरिकांनी सुरक्षिततेसाठी घराबाहेर धाव घेतली. या भूकंपाची तीव्रता ४.५ इतकी नोंदवण्यात आली असून, त्याचा केंद्रबिंदू मध्य प्रदेशातील खरगोन परिसरात असल्याची माहिती समोर आली आहे. सुदैवाने, आतापर्यंत कोणतीही जीवित किंवा वित्तहानी झाल्याचं वृत्त नाही.
सकाळी अचानक जमीन हादरली
मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी सकाळी नागरिक आपापल्या दैनंदिन कामात व्यस्त असताना अचानक जमिनीला हादरे जाणवू लागले. काही घरांमधील वस्तू हलल्याने नागरिक घाबरले आणि घराबाहेर पडले. काही वेळातच भूकंपाचे धक्के जाणवल्याची माहिती परिसरात पसरली. नागरिकांनी एक…
हतनूर धरण परिसरालाही हादरे
या भूकंपाचे धक्के हतनूर धरण परिसरातही जाणवले. माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, शनिवारी सकाळी सुमारे ९.१५ वाजता धरण परिसरातील चौकीला दोन ते तीन सेकंद हादरे जाणवले. यावेळी चौकी हादरल्याचं तेथील कर्मचाऱ्यांनी सांगितलं. मात्र, धरण परिसरातील भूकंप निरीक्षण यंत्रणा बंद असल्याने त्या ठिकाणी हादऱ्यांची नेमकी तीव्रता किती होती, हे समजू शकलेलं नाही. धरणाचं नुकसान झाल्याची कोणतीही पुष्टी झालेली नाही.
अडीच महिन्यांपूर्वीही जाणवले होते धक्के
विशेष म्हणजे, जळगाव जिल्ह्यातील रावेर तालुक्यात यापूर्वीही भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले होते. सुमारे अडीच महिन्यांपूर्वी झालेल्या त्या घटनेनंतर शनिवारी पुन्हा जमीन हादरल्याने नागरिकांमध्ये चिंता वाढली आहे. दरम्यान, प्रशासनाकडून परिस्थितीवर लक्ष ठेवण्यात येत असून, नुकसानाबाबतची अधिकृत माहिती संकलित केली जात आहे.
Shabda Khadag © 2026. All Rights Reserved.
Developed By Vighnesh Technologies.