शुक्रवार दिनांक 31 जुलै 2026 रोजी डोंबिवली पश्चिमेच्या शास्त्रीनगर रुग्णालयात बहुजन समाज पार्टी द्वारे रुग्णांना चांगल्या सुविधा द्या म्हणून आंदोलन करण्यात आले तथा कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. दिपा शुक्ल व संबंधितांना एक निवेदन देण्यात आले. १२० खाटांचे हे रुग्णालय आहे व परिसरातील गोरगरीब रुग्ण इथे इलाज करून घेण्यासाठी येतात. रुग्णालयात तसे पाहिल्यास सर्व आजारांवरचे विभाग कार्यरत आहेत मात्र यापैकी किती विभाग कार्यरत आहेत व इथे किती सुविधा मिळतात हा संशोधनाचा विषय ठरेल असे आंदोलनकर्त्यांचे मत आहे..
निवेदनातील मुख्य मागण्या खालील प्रकारे..
औषध पुरवठा व NICU सुविधा सर्वसामान्य रुग्णांना व्यवस्थित मिळणे बाबत.. येथील डॉक्टर रुग्णालयातील औषधे कमी प्रमाणात असल्याने रुग्णांना बाहेरून औषधे आणावी लागतात.. म्हणून कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेने औषधांचा योग्य साठा उपलब्ध करून द्यावा.. सध्या इथे वसंत व्हॅली बाह्यसंस्थेमार्फत 10 बेड्चे NICU आणि 5 बेड्चे MICU सुरु करण्यात येणार आहे.. मात्र या सुविधांमध्ये वाढ करण्यात यावी असे आंदोलनकर्त्यांची प्रमुख मागणी आहे. छोट्या शिशूंसाठी चांगल्या सुविधा द्याव्यात असे आंदोलनकर्त्यांनी सांगितले.. सध्या इथे रुग्णालय दुरुस्तीचे काम सुरु आहे. येथील सर्व विभागांत गरीब रुग्णांना परवडेल या दारात महापालिकेने उपचार उपलब्ध करून द्यावेत व स्टाफचा तुटवडा नसावा असेही काही कार्यकर्त्यांनी वार्ताहरांशी बोलताना सांगितले.. या प्रसंगी बहुजन समाज पार्टीचे सुरेंद्र गौतम डोंबिवली विधानसभा अध्यक्ष, आनंद अंबोरे विधानसभा उपाध्यक्ष, नरेश जैसवार कोषाध्यक्ष उपाध्याय कार्यकर्ता, सतिश बैसाणे कार्यकर्ता भुजबल कार्यकर्ता निकम कार्यकर्ता इत्यादी अनेक मंडळी उपस्थित होती..
- दिनकर सोमासे. कॅमेरामन शब्द खड्ग डिजिटल वृत्तपत्र..
Shabda Khadag © 2026. All Rights Reserved.
Developed By Vighnesh Technologies.