देऊळबंद 2 चित्रपट पाहायचा होता खरंतर राघव श्यास्त्री म्हणजेच गश्मीर महाजनीसाठी पण तिकीट काढल्यावर लक्षात आले तो यामध्ये अगदी शेवटला काही सेकंदासाठी आहे...
चित्रपटात मोहन जोशी भाव खाऊन जाणार यात काही शंकाच नाही म्हणून चलता है चलता है म्हणतं पॉपकॉन घेऊन चित्रपट गृहात दाखल झाले.
चित्रपट सुरु झाला आणि हातात दगड घेऊन स्नेहल तरडे चा पहिला सिन फ्रेम मध्ये होता...
चित्रपट सुरु होऊन जवळ जवळ 15-20 मिनिट चित्रपटाचा प्रवास तुम्हांला एक सेकंद हि हलून देत नाही...
मोहन जोशीची स्वामी म्हणून असलेली एंट्री ते गावात पोहोचे पर्यंत असलेला एका नास्तिक पत्नीचा आणि देवाचा संवाद...
मिश्किल हसवत हसवत टचकन डोळ्यात पाणी आणतो आणि तुम्ही पार आतून हादरून जातात...
त्याचं एकमेव कारण म्हणजे स्नेहल तरडे चा विलक्षण अद्भुत असा अभिनय...
तो तुम्हांला इतका खिळवून ठेवतो की, गावात एंट्रीच्या त्या सिनला तुमच्या मनात धस होणारच...
मोहन जोशी सारख्या जेष्ठ आणि मोठ्या कलाकाराकडून उत्कृष्ट कामाची हमी आपल्याला आहेच. त्यांनी अप्रतिम काम केलंय पण खरं सांगू, काही टक्क्यांनी भाव खाऊन गेलीय ती स्नेहल तरडे...
स्नेहल तरडे चा दहा वर्षांपूर्वी देऊळ बंद च्यावेळेचा अभिनय आणि आजची तिची कलाकृती यामध्ये तिच्यातील अभिनेत्री म्हणून झालेला बदल अगदी प्रखरशाने दिसून येतो.
स्नेहलचा चेहरा, हास्य आणि डोळे हे वेगवेगळ्या प्रसंगाला इतके बदलेले आहेत की कुठे हि अभिनयात तोचतोचपणा वाटतं नाही उलट तिची प्रत्येक वेळेची रियक्शन खूपचं भारी वाटते.
स्नेहल चे मिश्किल हसू, जोरजोरात हसता हसता मोठा हंबरडा असं चरकन काळीज चिरायचं..
ते बेरकी हसू अजून हि डोळ्या समोरून जातं नाही. तितक्याच पटीने तिच्या डोळ्यातील अभिनय.. आ हाहा..
राग, सूड, अहंकारासोबतच डोळ्यांच्या कडेला अश्रूचा ओलसर रोखून ठेवलेला थेंब... आणि कणखर आवाजात घेतलेले संवाद तुम्हांला संपूर्ण चित्रपटाशी खिळवून ठेवते.
चित्रपटाची कथा हि बळीराजाची आहे. केवळ महाराष्ट्रातीलच नाही, तर देशातला बळीराजा राज्यकर्त्यांच्या चुकीच्या धोरणाचा, नापिकतेचा, बाजार व्यवस्थेचा, प्रशासकीय अनास्थेचा आणि स्वतःच्याच रूढी, परंपरांच्या अनिष्ट प्रथे मध्ये खोल रुततं चालेला आहे. त्यामुळे व्यवस्था व निसर्गाच्या अवकृपेने चिरडलेल्या, पिचलेल्या शेतकऱ्याच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालणारा हा चित्रपट आहे.
खरंतर हि कथा प्रत्येकाच्या गावातील शेतीच्या आणि शेतकऱ्यांच्या दारुण जीवनाची आहे. कर्जबाजारी, नापिक जमीन, दुष्काळ, हमीभाव या वेढ्यात अडकेलेले शेतकरी आत्महत्या करतात....
राज्यकर्ते, प्रशासन आणि निसर्गाच्या व्यवस्थेत भरडून निघालेल्या एका नास्तिक पत्नीची व्यथा आणि तिने थेट देवालाच विचारलेला जाब त्याची घेतलेली परीक्षा आणि स्वामींनी दिलेली उत्तरे तुम्हां आम्हांला विचार करायला भाग पाडतात...
प्रवीण तरडे यांचं कामलीच दिग्दर्शन आणि लेखन हि चित्रपटची जमेची बाजू आहे.
या चित्रपटातून अनेक गोष्टीवर भाष्य करण्याचा प्रयत्न केलेला आहे. पुस्तकांचे महत्व नकळत लोकांच्या नजरेत आणून दिलंय...
स्वामी जेव्हा पुस्तकांचा आधार घेतात आणि उपदेश देतात शिक्षण किती महत्वाचं, वाचन तुम्हांला कसं समृद्ध करत तेव्हा सदसडीत चपराक बसते... आपण शिक्षणाने चं समृद्ध होऊ शकतो, तुम्हांला तुमची परिस्थिती बदलायची असेल तर शिक्षणाला पर्याय नाही...
ऑनलाईन युगात स्वामींच्या हातात पुस्तक दाखवून मन जिंकलं...
जातीपातीत अडकलेले जेव्हा पोटाची खळगी भरण्यासाठी सगळं बाजूला ठेवून हातात असलेल्या गोष्टीतून व्यवसाय करण्यासाठी कुटुंबाकरीता एकत्र येतात तेव्हा मन भरून येतं... पर्याय आजूबाजूला असतात फक्त डोळसपणा हवा...
खोट्या घराण्याशाई च्या नावाखाली भक्कम हुंडा देऊन मुलीला कोणत्याही घरात लोटून दयायला तयार असलेल्या बापावर मुलगी तिच्या हुशारीवर ठाम राहून मन परिवर्तन करते.
भक्कम पैसे असलेल्या नातेवाईकांच्या गर्दीत शेतकरी भाऊ कसा दुर्लक्षित होतो. हे सुद्धा फार थेट शब्दांत मांडलेले आहे. सर्वात मनाला स्पर्शून गेलेलं म्हणजे, जवळच्या माणसाचं मन ओळखायला लागा. त्यांच्या मनाचा मागोवा घ्या, देहबोली समजून घ्या...
चित्रपटामध्ये चमत्कार न दाखवता, माणसच कशी माणसांच्या कामी येतात... माणसानी दिलेला धीर तुमच्या मनातला आत्महत्याचा निर्णय खोडून काढू शकतो. फास्ट आयुष्यात आपण स्थिरावतचं नाही... जवळची व्यक्तीचं मन सुद्धा आपल्याला कळत नाही.डिजिटल युगात व्हर्चूअल पेक्षा पुस्तकांना आपलंस करा, माणसांना वेळ दया... बघा एक तरी आत्महत्या वाचवू शकता...
असे अनेक पैलू या चित्रपटा मध्ये आपल्याला पाहायला मिळतात...
आवर्जून चित्रपट पहा..
स्नेहल तरडे चा अभिनय काही वर्ष तरी माझ्या मनातून पुसला जाणार नाही. तरडे दाम्पत्यांना खूप शुभेच्छा...
स्वामी हो...
- नमिता दोंदे. महाराष्ट्र विशेष प्रतिनिधी शब्द खड्ग डिजिटल वृत्तपत्र..
Shabda Khadag © 2026. All Rights Reserved.
Developed By Vighnesh Technologies.