अमेरिकेच्या व्यापार प्रतिनिधी कार्यालयाने (यूएसटीआर) भारतीय वस्तूंवर १७ टक्के आयात शुल्क प्रस्तावित केले आहे. भारतात औद्योगिक उत्पादनांची अतिरिक्त क्षमता निर्माण झाल्याचा दावा करत, अमेरिकी कंपन्यांना त्यामुळे नुकसान होऊ शकते, असे कार्यालयाने म्हटले आहे..
वॉशिंग्टन : भारतात औद्योगिक उत्पादनांची अतिरिक्त क्षमता निर्माण झाल्याचा दावा करत, अमेरिकी कंपन्यांना त्यामुळे नुकसान होऊ शकते, असे कार्यालयाने म्हटले आहे. भारतासोबत व्यापार करार न झाल्यास हे शुल्क २५ टक्के राहण्याची शक्यता आहे. अमेरिकेने १६ अर्थव्यवस्थांना लक्ष्य करत अतिरिक्त औद्योगिक उत्पादन क्षमतेसंदर्भात सुरू केलेल्या कलम ३०१ अंतर्गत तपासणीचा हा भाग आहे.
प्रस्तावित शुल्क हे सक्तीच्या मजुरीविरोधातील उपाययोजना किंवा विशिष्ट क्षेत्रांवर लागू असलेल्या विद्यमान शुल्कांव्यतिरिक्त आकारले जाणार नाही, असे वृत्त ‘अॅक्सिओस’ने वरिष्ठ अमेरिकी अधिकाऱ्याच्या हवाल्याने दिले आहे. अमेरिकेच्या उद्योगांना हानी पोहोचवणाऱ्या अतिरिक्त उत्पादनामुळे वस्तूंच्या किमती कमी होत असल्याचा आरोप करत यूएसटीआर गेल्या काही महिन्यांपासून १६ देशांच्या धोरणांचा आढावा घेत आहे.
Shabda Khadag © 2026. All Rights Reserved.
Developed By Vighnesh Technologies.