रविवार ८ मार्च २०२६ रोजी डोंबिवली पश्चिमेच्या द्वारका हॉटेलात सोहळा संपन्न..
शब्द खड्ग डिजिटल वृत्तपत्र फक्त वृत्तपत्रच नाही तर नवोदित आणि ज्यांना कुठेच संधी भेटत नाही अशा लोकांना संधी देणारा एक अग्रगण्य मंच आहे. आजवर शब्द खड्गने विविध क्षेत्रांतील आणि तळागाळातील अनेकांचा सत्कार केला आहे. यावर्षी सुद्धा आपल्या लौकिकाला जागत शब्द खड्गने महिला दिनाचे औचित्य साधून महिलांसाठी खास डोंबिवली पश्चिमेच्या द्वारका हॉटेलात युगंधरा पुरस्कार आयोजित केला होता. यावेळी तिथे उपस्थित असलेल्या इतर मुली आणि माता-भगिनींचा सुद्धा शब्द खड्गने पेढे भरवून सत्कार केला. शब्द खड्ग फक्त तोंड बघून सत्कार करीत नाही. गोर गरीब माता भगिनींना आणि इतर गरजवंतांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शब्द खड्ग अहोरात्र झटत आहे. या प्रसंगी शब्द खड्गच्या साईली बनसोडे, भारती खरात, लता जाधव, कल्पना बनसोडे, ज्योती खडपे यांचा शब्द खड्गचे संपादक प्रा. दिपक जाधव यांनी मनाचा युगंधरा पुरस्कार देऊन विशेष सत्कार केला..
कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी शिवाजी जाधव, दिनकर सोमासे, रमेश गभाले, सुनिल बनसोडे, साईली बनसोडे, लता जाधव, भारती खरात, कल्पना बनसोडे, ज्योती खडपे, विलास चव्हाण, बाबू जाधव, संजय मामा खडपे, पुंडलिक गोडे, मैत्रेय जाधव आणि शब्द खड्ग टीम ने विशेष परिश्रम घेतले. या प्रसंगी शब्द खड्ग तर्फे सत्कारमूर्ती महिलांना सन्मानपत्र, भेट वस्तू आणि भोजन देण्यात आले..
- प्रा. दिपक जाधव. संपादक शब्द खड्ग डिजिटल वृत्तपत्र..
Shabda Khadag © 2026. All Rights Reserved.
Developed By Vighnesh Technologies.