तरुणाईच्या सळसळत्या उत्साहात डोंबिवलीमध्ये मराठी नववर्ष गुढीपाडवा शोभायात्रा धुमधडाक्यात संपन्न..

डोंबिवली पोलिसांचा चोख बंदोबस्त.. नव्वद टक्के तरुण तरुणी आणि दहाटक्के ज्येष्ठ मंडळी आणि कच्च्या बच्च्यांचा सहभाग.. 

डोंबिवलीच्या सुप्रसिद्ध श्री गणेश मंदिर संस्थानाने गुढीपाडवा शोभायात्रेचा पायंडा पाडला आहे. व आज फक्त राज्य आणि देशातच नाही तर सातासमुद्रापार जिथे जिथे मराठी माणूस आहे तिथे तिथे गुढीपाडव्या निमित्त शोभायात्रा निघत आहेत.. गुरुवार १९ मार्च २०२६ रोजी डोंबिवली पूर्व पश्चिम असे शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले होते.  यात विविध विषयांना वाहिलेले देखावे, रथ, ढोल लेझीम वाद्यवृंदात नाचणाऱ्या महिला मुली आणि तरुण, डॉग शो, भजनी मंडळे, विविध राजकीय, सामाजिक संस्था,संघटना यांचे देखावे आणि उपस्थिती, पोलिसांचा चोख बंदोबस्त, रस्त्याच्या दुतर्फा असलेली डोंबिवलीकरांची गर्दी. स्वयंसेवी संस्था लोकांना देत असलेले पाणी, सरबत, चौक चौकात मराठी गीत गायनाचे स्टेज आणि सीरिअल कलाकार, मीडियाची मांदियाळी. अशा वातावरणात नटलेला डोंबिवलीचा फडके रोड, पारंपरिक वेशात सजलेल्या तरुण तरुणींनी फुलांच्या ताटव्या प्रमाणे बहरून आला होता. याच फडके रोडवर अशा कार्यक्रमांत अनेक प्रेमाची नाती जुळतात  व मग लग्नाची रेशीमगाठ बांधली जाते. नंतर ही मंडळी आजूबाजूच्या हॉटेलांत खाद्य पदार्थांवर ताव मारते. एकूण काय तर डोंबिवलीच्या आणि मराठी माणसाने सण वार आणि आपली परंपरा जपली आहे. इतर प्रांतातील मंडळीसुद्धा यात मोठ्या उत्साहाने भाग घेतांना दिसते. असे कार्यक्रम आपापसातील एकोपा वाढवितात अशा भावना शब्द खड्ग सोबत बोलतांना अनेक मंडळींनी व्यक्त केल्या.. 

- प्रा. दिपक जाधव. संपादक शब्द खड्ग डिजिटल वृत्तपत्र..

65
Get In Touch

Dombivli

+91 9967872052

contact@shabdakhadag.in

Follow Us
लोकप्रिय बातम्या

Shabda Khadag © 2026. All Rights Reserved.

Developed By Vighnesh Technologies.