मानसिक त्रास आणि मारहाणीमुळे झालेला अपमान सहन न झाल्याने १६ वर्षीय मुलीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना काशीगाव परिसरात घडली..
भाईंदर : मानसिक त्रास आणि मारहाणीमुळे झालेला अपमान सहन न झाल्याने १६ वर्षीय मुलीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना काशीगाव परिसरात घडली. या प्रकरणी मुलीच्या आईच्या तक्रारीवरून काशीगाव पोलिसांनी अमन चौहान (२३), सरोज चौहान (५०) आणि शेखर चौहान (२०) यांच्याविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करून तिघांना अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, श्रीराम नगर चाळ, मीनाक्षीनगर, काशीगाव, मीरा रोड पूर्व येथे राहणाऱ्या संगीता सुरेश पुहाल (४०) यांची १६ वर्षीय मुलगी शर्वरी पुहाल ही १२ ऑगस्ट रोजी सकाळी सुमारे १० वाजता राहत्या घरी आत्महत्या केलेल्या अवस्थेत आढळून आली.
तक्रारीनुसार, अमन चौहान, त्याची आई सरोज आणि भाऊ शेखर यांच्याकडून शर्वरीला मानसिक त्रास दिला जात होता. तसेच ११ ऑगस्ट रोजी सरोज चौहान हिने शर्वरीला मारहाण करून शिवीगाळ केल्याचा आरोप आहे.
Shabda Khadag © 2026. All Rights Reserved.
Developed By Vighnesh Technologies.