मुसळधार पावसात चुकीच्या ठिकाणी उतरल्याने ती अडकली होती. मदतीच्या बहाण्याने चालक आणि कंडक्टरने तिला बसमध्ये घेतले आणि सुमारे ४७ किलोमीटरच्या प्रवासादरम्यान..
नवी दिल्ली : राजधानी दिल्लीला हादरवून सोडणाऱ्या २०१२ च्या ‘निर्भया’ प्रकरणाची आठवण ताजी करणारी धक्कादायक घटना समोर आली आहे. उत्तर प्रदेशातील १६ वर्षीय विद्यार्थिनीवर धावत्या स्लीपर बसमध्ये सामूहिक लैंगिक अत्याचार करण्यात आला. मुसळधार पावसात चुकीच्या ठिकाणी उतरल्याने ती अडकली होती. मदतीच्या बहाण्याने चालक आणि कंडक्टरने तिला बसमध्ये घेतले आणि सुमारे ४७ किलोमीटरच्या प्रवासादरम्यान तिच्यावर अत्याचार केला. या प्रकरणी चालक कुलदीप आणि कंडक्टर संदीप या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे.
नेमकं काय घडलं?
'टाईम्स ऑफ इंडिया'च्या वृत्तानुसार, मैनपुरी जिल्ह्यातील ही मुलगी इयत्ता अकरावीत शिकते. ४ ऑगस्टच्या रात्री कुटुंबीयांशी वाद झाल्यानंतर ती नोएडात राहणाऱ्या चुलत भावाला भेटण्यासाठी घरातून निघाली. मुसळधार पाऊस आणि अंधारामुळे ती चुकून ग्रेटर नोएडातील परी चौक येथे उतरली. पुढ…
तपासात ही बस यापूर्वी बंद पडल्याने सुरजपूर येथील वर्कशॉपमध्ये दुरुस्तीसाठी नेण्यात आली होती. दुरुस्तीनंतर चालक आणि कंडक्टर रिकामी बस तिमारपूरकडे घेऊन जात असताना त्यांना परी चौक येथे ही मुलगी भेटली. बसमधील स्लीपर बर्थभोवती पडदे असल्यामुळे आत नेमके काय सुरू होते, हे बाहेरून सहज दिसत नव्हते, असेही पोलिसांनी सांगितले.
काय होतं 'निर्भया' प्रकरण?
१६ डिसेंबर २०१२ रोजी दिल्लीतील धावत्या बसमध्ये २३ वर्षीय तरुणीवर सामूहिक लैंगिक अत्याचार करण्यात आला होता. गंभीर जखमी झालेल्या तरुणीचा नंतर उपचारादरम्यान मृत्यू झाला. या घटनेनंतर देशभर संताप उसळला आणि लैंगिक गुन्ह्यांशी संबंधित कायदे अधिक कडक करण्यात आले. माध्यमांनी पीडितेला ‘निर्भया’ हे नाव दिले होते.
Shabda Khadag © 2026. All Rights Reserved.
Developed By Vighnesh Technologies.