महाराष्ट्राचा युपी, बिहार होतोय का ? संतप्त नागरिकांचा सवाल..
कल्याण - सविस्तर वृत्त : मदत करण्याच्या बहाण्याने पीडित विवाहित महिलेवर भिवंडी तालुक्यातील बापगाव येथे सामूहिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.
मदत करण्याच्या बहाण्याने पीडित विवाहित महिलेवर भिवंडी तालुक्यातील बापगाव येथे सामूहिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघाचे भाजपचे माजी आमदार नरेंद्र पवार व बडतर्फ पोलिस शैलेश पाटील यांच्या विरोधात पडघा पोलिस ठाण्यात सामूहिक लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला.
१३ सप्टेंबर रोजी गुरुवारी पहाटे शस्त्राचा धाक दाखवून मद्य पाजून सामूहिक बलात्कार केल्याप्रकरणी पीडितेने दिलेल्या तक्रारीवरून पडघा पोलिस ठाण्यात विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित विवाहितेचा पतीशी वाद होता. त्यात मध्यस्थीसाठी माजी आमदार नरेंद्र पवार यांनी पीडितेला स्वत:च्या कार्यालयात बोलावले होते. त्यानंतर १३ सप्टेंबर रोजी नरेंद्र पवार व त्यांचा साथीदार बडतर्फ पोलिस कर्मचारी शैलेश पाटील यांनी तिला बापगावमधील स्वत:च्या शेतघरावर (फार्म हाऊस) नेले. तेथे तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. घटनेच्या रात्री दोन वाजता पवार तेथून निघून गेले. शैलेश पाटील यांनी पहाटे चार वाजता अन्य एका साथीदाराच्या मदतीने पीडितेला तिच्या घरी आणून सोडले.
भयभीत अवस्थेतील पीडितेने १६ सप्टेंबर रोजी कल्याणमधील काँग्रेस नगरसेविका कांचन कुलकर्णी यांच्याकडे घडलेला प्रसंग सांगत मदत मागितली. भाजपचे माजी आमदार नरेंद्र पवार व बडतर्फ पोलिस कर्मचारी शैलेश पाटील या दोघांनी मिळून लैंगिक अत्याचार केल्याचे व त्या संबंधी आपल्याकडे ध्वनिचित्रफित व मोबाइलवरील संभाषण असल्याचे दाखवले. त्यानंतर कुलकर्णी यांनी महिलेला घेऊन रात्री पडघा पोलीस ठाणे गाठले. तेथे पहाटे माजी आमदार नरेंद्र पवार व शैलेश पाटील या दोघांविरोधात पीडितेच्या तक्रारीवरून सामूहिक अत्याचाराचा गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी मला आता न्याय द्यावा. अशी मागणी पीडित महिलेने केली आहे.
या संदर्भात वरिष्ठ पोलीस निरीक्षक पकंज गिरी यांच्याशी संपर्क साधला असता माजी आमदार नरेंद्र पवार व त्यांचा मित्र बडतर्फ पोलिस कर्मचारी असलेला शैलेश पाटील यांच्या विरोधात सामूहिक अत्याचारा सह विविध कलमानुसार गुन्हा दाखल करून या गुन्ह्याच्या आधारे पोलीस पथकाने तपास सुरू करत दोन्ही आरोपींचा शोध सुरु केल्याची माहिती त्यांनी दिली.
Shabda Khadag © 2026. All Rights Reserved.
Developed By Vighnesh Technologies.