भिवंडी : तरुणांची रिक्षाचालकाला मारहाण; उपचारादरम्यान मृत्यू; दोघांना अटक..

रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या तरुणांकडून नागरिकांवर शेरेबाजी केली जात असल्याचा जाब विचारणे ६५ वर्षीय रिक्षाचालकाच्या जिवावर बेतले. तरुणांच्या टोळक्याने केलेल्या मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या रिक्षाचालकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला..

भिवंडी : रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या तरुणांकडून नागरिकांवर शेरेबाजी केली जात असल्याचा जाब विचारणे ६५ वर्षीय रिक्षाचालकाच्या जिवावर बेतले. तरुणांच्या टोळक्याने केलेल्या मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या रिक्षाचालकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. जमीर मोहम्मद कासीम मोमीन (६५) असे मृताचे नाव आहे. या घटनेचा सीसीटीव्ही व्हिडीओ समाजमाध्यमांवर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे.

जुना ठाणे रोड परिसरातील समदनगर येथे जमीर मोमीन जात असताना काही तरुणांकडून ये-जा करणाऱ्या नागरिकांवर शेरेबाजी सुरू असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. याबाबत जाब विचारण्यासाठी ते मोहम्मद अली सलीम अहमद मोमीन (१९), हमजा उस्मान मोमीन (२०) आणि नबीग इम्रान मोमीन (३०) यांच्याकडे गेले. यावेळी बाचाबाची होऊन वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. या वेळी सलीम अहमद मोमीन, मोहम्मद अली मोमीन आणि अन्य आरोपींनी जमीर मोमीन यांना बेदम मारहाण केली.

27
Get In Touch

Dombivli

+91 9967872052

contact@shabdakhadag.in

Follow Us
लोकप्रिय बातम्या

Shabda Khadag © 2026. All Rights Reserved.

Developed By Vighnesh Technologies.