डोंबिवलीतील शिंदे सेनेचा मारकुटा नगरसेवक रमेश म्हात्रेंचा जामीन रद्द..

आरोपींना चिथावणी देऊन रूग्णालयात हिंसाचार घडण्याला कारणीभूत ठरलेल्या साधना कारंडे हिला विष्णुनगर पोलिसांकडून रविवारी अटक..

कल्याण डोंबिवली महापालिकेचे शिवसेनेचे नगरसेवक रमेश म्हात्रे यांना मुंबई हायकोर्टाने मोठा दणका दिला आहे. कारण कल्याणच्या प्रथमवर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांनी दिलेला जामीन मुंबई हायकोर्टाने रद्द केला आहे. म्हात्रेला पोलिसांसमोर हजार व्हावे लागले जर ते  हजर झाले नसते  तर त्यांच्या मालमत्तेवर टाच आणणार होते आणि म्हणून म्हात्रे रविवारी पोलिसांसमोर हजर  झाले.. 

या प्रकरणात जिने भांडण लावून दिले ती साधना कारंडे नामनिराळी राहिली होती मात्र डोंबिवलीत या कारंडे बाबत आणि पोलिसांच्या म्हात्रेंना व्हीआयपी वागणूक देत असलेल्या प्रकरणाने लोक चिडले आहेत.. त्यातच वकिलांनी पोलिसांविरोधात केलेले आंदोलन सुद्धा चांगलेच गाजले. आता लोक म्हणत आहेत की म्हात्रे गुन्हेगार प्रवृत्तीचे आहेत व त्यांना देशभरातील डॉक्टरांच्या निषेधाला सामोरे जावे लागत असल्याचे कल्याण दंडाधिकाऱ्यांना दिसले नाही काय ? पोलीस आणि न्यायपालिका म्हात्रे खिशात घेऊन फिरत आहेत काय ? गरिबाला एक न्याय आणि पैसेवाल्या राजकारणी गुन्हेगाराला एक न्याय. किमान आतातरी पोलीस आणि कल्याणच्या दंडाधिकाऱ्याने गन्हेगाराला वाचक बसेल असे काम करावे.. एक मात्र नक्की की डोंबिवलीतील सर्वसामान्य जनता रमेश म्हात्रे आणि साधना कारंडे हिच्या अटकेने सुखावली आहे..

59
Get In Touch

Dombivli

+91 9967872052

contact@shabdakhadag.in

Follow Us
लोकप्रिय बातम्या

Shabda Khadag © 2026. All Rights Reserved.

Developed By Vighnesh Technologies.