संदर्भ - १) मा. अपर पोलीस महासंचालक, महिला व बाल अपराध प्रतिबंध विभाग, महाराष्ट्र राज्य मुंबई यांचेकडील पत्र क्र. पोमसं/ ४२ / मबाअप्रवि/२/प्र.क्र.१९/२०२५ दिनांक १५.०४.२०२५
२) मा. पोलीस आयुक्त, लोहमार्ग मुंबई यांचे कार्या. जा. क्र. एमपीबी/ ऑपरेशन शोध/११७/२०२५
दिनांक १५.०४.२०२५ अन्वये.
सहाय्यक पोलीस आयुक्त श्री अरुण पोखरकर साहेब. कल्याण विभाग, लोहमार्ग मुंबई यांनी काढलेल्या परिपत्रकान्वये.
जावक क्रमांक १७९९/२०२५ दिनांक १७.०४.२०२५.
उपरोक्त विषयान्वये कळविण्यात येते की, हरवलेल्या महिला व बालकांच्या संदर्भात दिनांक १७.०४.२०२५ ते १५.०५.२०२५ या कालावधीत शोध घेण्यासाठी "ऑपरेशन शोध" ही विशेष मोहिमसर्व रेल्वे पोलीस ठाणे व पोलीस उप विभाग स्तरावर राबविण्याबाबर मा. कार्यालयाकडून कळविण्यात आलेले आहे. त्याप्रमाणे सहाय्यक पोलीस आयुक्त, कल्याण, लोहमार्ग मुंबई कार्यक्षेत्रातील ठाणे, डोंबिवली, कल्याण, कर्जत या ४ रेल्वे पोलीस ठाणे हद्दीत सदरची मोहिम राबविण्यात येत आहे.
सदर मोहिमे दरम्यान हरविलेल्या महिला, लहान मुले व लहान मुली यांचा शोध घेण्यात येणार आहे. तसेच बाल सुधार गृह व बालनिरीक्षण गुहांमधील दाखल मुलांबाबत माहिती घेऊन त्यांचे पालक/कुटुंबीय /नातेवाईकांचा शोध घेतला जाणार आहे. तसेच रेल्वे स्थानकांवर फिरणाऱ्या अल्पवयीन बालकांची चौकशी करणे, अल्पवयीन बालकांना बेकायदेशीर काम करण्यास लावलेल्या ठिकाणी छापे टाकून तेथील बालकांची सुटका करणे व अशा बालकांना त्यांचे कायदेशीर पालक किंवा अन्य संस्थांकडे सुपूर्द करण्यात येणार आहे. अशी माहिती श्री, अरुण पोखरकर साहेब सहाय्यक पोलीस आयुक्त कल्याण विभाग, लोहमार्ग मुंबई यांनी परिपत्रकाद्वारे दिली आहे..
- प्रा. दिपक जाधव. संपादक शब्द खड्ग डिजिटल वृत्तपत्र..
Shabda Khadag © 2025. All Rights Reserved.
Developed By Vighnesh Technologies.