पहिल्याच पावसाने मुंबईची दैना! रेल्वे विस्कळीत; रस्ते वाहतूक कोलमडली, भूमिगत मेट्रो स्थानक जलमय, मंत्रालयात पाणीच पाणी, सरकारी यंत्रणा ठरल्या कुचकामी.

नियोजित वेळेच्या तब्बल १६ दिवस आधी महाराष्ट्रासह मुंबईत वरुणराजाची एंट्री झाल्याने पहिल्याच पावसात मुंबईकरांची त्रेधातिरपीट उडाली. वरुणराजाने राज्यातील बहुतांश भागांना झोडपून काढले. मुंबईत रविवारी रात्रीपासूनच सुरू झालेल्या पावसाने संततधार कायम ठेवत मुंबईची दाणादाण उडवली, तर पहिल्याच पावसात मुंबईची दैना झाली आहे..

नियोजित वेळेच्या तब्बल १६ दिवस आधी महाराष्ट्रासह मुंबईत वरुणराजाची एंट्री झाल्याने पहिल्याच पावसात मुंबईकरांची त्रेधातिरपीट उडाली. वरुणराजाने राज्यातील बहुतांश भागांना झोडपून काढले. मुंबईत रविवारी रात्रीपासूनच सुरू झालेल्या पावसाने संततधार कायम ठेवत मुंबईची दाणादाण उडवली, तर पहिल्याच पावसात मुंबईची दैना झाली आहे. रस्तेवाहतुकीचा बोजवारा उडाला, तर मध्य रेल्वेला फटका बसला आणि हार्बर रेल्वे सेवा सीएसएमटी ते वडाळापर्यंत दुपारपर्यंत ठप्प होती. राज्यात पहिल्याच पावसाने दोन बळी घेतले असून मुंबईत मे महिन्यात १०० वर्षांतील सर्वाधिक पावसाची नोंद झाली. इतिहासात मंत्रालयात प्रथमच पाणीच पाणी झाले, तर काही दिवसांपूर्वीच उद्घाटन करण्यात आलेले वरळीतील आचार्य अत्रे चौक हे भूमिगत मेट्रो स्थानक जलमय झाले होते.

रविवारी रात्रीपासून बरसणाऱ्या पावसाचा जोर सोमवारी सायंकाळपर्यंत कायम होता. जोरदार वाऱ्यासह बरसणाऱ्या पावसामुळे मुंबईसह राज्यातील जनजीवन विस्कळित झाले. मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सातारा, सांगली, अमरावती, बारामती तालुक्यातील बहुतांश जिल्ह्यांना पावसाने अक्षरश: झोडपून काढले. अनेक ठिकाणी झाडे कोसळली, नद्यांना पूर आल्याने जनावरे वाहून गेल्याच्या घटना घडल्या. राज्याचा कारभार चालणाऱ्या मंत्रालयात इतिहासात प्रथमच गुडघाभर पाणी तुंबल्याने एकच तारांबळ उडाली. मंत्रालयात पाणी शिरल्याने महायुतीच्या कारभारावर ताशेरे ओढले. हिंदमाता, मिलन सबवे, दादर टिटी, सायन सर्कल, परळ आदी सखल भाग पाण्याखाली गेल्याने चाकरमान्यांचे अतोनात हाल झाले.

मुंबईत गेल्या ७५ वर्षांत मे महिन्यात इतक्या लवकर मान्सूनचे आगमन होण्याची ही पहिलीच वेळ ठरली, असे भारतीय हवामान विभागाच्या मुंबईतील संचालिका शुभांगी भुते यांनी सांगितले. रविवारी रात्री ८ ते सोमवारी सकाळी ८ वाजेपर्यंत मुंबईत १८ ठिकाणी शॉर्टसर्किटच्या घटना घडल्या. ३२ ठिकाणी झाडे कोसळली तर पाच ठिकाणी भिंत कोसळल्याची घटना घडली. सोमवारी सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत कुलाबा येथे १४४.३ मिमि तर सांताक्रूझ येथे ७४.३ मिमि पावसाची नोंद झाली.

15
Get In Touch

Dombivli

+91 9967872052

contact@shabdakhadag.in

Follow Us
लोकप्रिय बातम्या

Shabda Khadag © 2025. All Rights Reserved.

Developed By Vighnesh Technologies.