नाशिक जिल्ह्यातील सिन्नर डेपोचा स्लॅब शिवशाही बसवर कोसळला..

सिन्नर येथे बस डेपोत उभी असलेल्या शिवशाही बसच्या पुढच्या भागावर स्लॅब कोसळल्याने बसच्या पुढच्या भागाचे मोठे नुकसान झाले आहे . कुणालाही इजा झाली नाही. कर्मचाऱ्यांनी प्रवाशांना सुखरुप बाहेर काढले..

महाराष्ट्र राज्यातील सर्वात सुंदर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या सि‌न्नर  परिवहन विभागासाठी बस डेपोचे बांधकाम करण्यात आले होते . सदर बस डेपो कडे प्रवाशांनी पाहिल्यानंतर खुप मोठे आकर्षण वाटते. अवकाळी पडणाऱ्या पावसामुळे  सिन्नर बस डेपोमध्ये उभ्या असलेल्या शिवशाही बसच्या पुढच्या भागावर स्लॅब कोसळल्याने बसचे नुकसान झाले आहे.. महाराष्ट्र राज्याचे कृषीमंत्री नामदार माणिकराव कोकाटे यांच्या प्रयत्नातून सिन्नर  येथे बस डेपो बनविण्यात आला होता.  त्यास रोल मॉडेल म्हणून ओळखले जायचे परंतु सिन्नर बस डेपोचे बांधकाम काम केवळ नऊ वर्षांपूर्वी करण्यात आले असताना बांधकाम केल्यापासून  त्या कामाची पडझड होत असल्याने कामावर प्रश्न चिन्ह उभे राहिले आहे . सिन्नर बस डेपोच्या बांधकामांची वरिष्ठ पातळीवरून चौकशी करुन संबंधित ठेकेदारांवर कारवाईची मागणी तेथील नागरिक व प्रवाशांनी केली आहे..

- श्री. रमाकांत पालवे. महाराष्ट्र विशेष प्रतिनिधी शब्द खड्ग..

13
Get In Touch

Dombivli

+91 9967872052

contact@shabdakhadag.in

Follow Us
लोकप्रिय बातम्या

Shabda Khadag © 2025. All Rights Reserved.

Developed By Vighnesh Technologies.