श्री समर्थ कृपा स्पेशल नीड चिल्ड्रेन स्कुलमध्ये पालकसभा संपन्न..

डोंबिवली पूर्वेच्या श्री समर्थ कृपा स्पेशल नीड चिल्ड्रेन स्कुलमध्ये मंगळवार दिनांक २९ एप्रिल २०२५ रोजी पालकसभा संपन्न झाली..

या प्रसंगी शाळेचे सर्वेसर्वा श्री. विनोद सूर्यराव सरांनी पालकांशी संवाद साधून येत्या नव्या शैक्षणिक वर्षात शाळा मुलांसाठी जुन्या बरोबरच जे नव नवे उपक्रम राबविणार आहे त्याची सविस्तर माहिती दिली. त्याच बरोबर शाळे समोर असलेल्या छोट्या मोठ्या समस्या बद्दल सुद्धा सविस्तर चर्चा केली.  या प्रसंगी काही पालकांनी त्यांची मनोगतं व्यक्त केली. अवघ्या तीन एक वर्षांत ही शाळा नावारूपाला आल्याचे सर्व श्रेय शाळेचे सर्वेसर्वा श्री. विनोद सूर्यराव सर आणि त्यांच्या शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी टीमला जातं. शाळा भाड्याच्या जागेत चालते. मात्र, सूर्यराव सरांची मुलांना शिकविण्याची जिद्द आणि चिकाटी फार वाखाणण्याजोगी आहे. पैशाची तंगी असतांनाही सूर्यराव सर न डगमगता लढत आहेत. काही पालक त्यांना यथाशक्ती मदत करीत आहेत. मात्र, शाळेला दानशूर व्यक्तींनी मदत केल्यास या स्पेशल नीड स्टुडंट्सच्या शिक्षणाचा मोठा प्रश्न मिटेल असे सांगावेसे वाटते. शाळेला मदत करण्यासाठी अथवा ऍडमिशन आणि इतर चौकशीसाठी 

संपर्क : श्री. विनोद सूर्यराव सर, मोबाईल नंबर - ९१५८३४६९०३

- प्रा. दिपक जाधव. संपादक शब्द खड्ग डिजिटल वृत्तपत्र..

10
Get In Touch

Dombivli

+91 9967872052

contact@shabdakhadag.in

Follow Us
लोकप्रिय बातम्या

Shabda Khadag © 2025. All Rights Reserved.

Developed By Vighnesh Technologies.