पत्रकाराला 'गॅंग रेपची बातमी का लावली?' म्हणत परिवारासह जीवे ठार मारण्याची धमकी!

आरोपी शबनम शेख हिचा भाऊ जावेद याचा प्रताप..

टिटवाळा: पत्रकारितेवर थेट हल्ला करत एका स्थानिक पत्रकाराला मोबाईलवरून अश्लील शिवीगाळ करत ‘गॅंग रेपची खोटी बातमी का लावली?’ असे विचारत पत्रकाराला व त्याच्या कुटुंबाला जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याचा गंभीर प्रकार घडला आहे. या प्रकरणी कल्याण तालुका पोलीस ठाण्यात संबंधित पत्रकाराने तक्रार दाखल केली असून, पोलीस याप्रकरणी तपास करत आहेत.

तक्रारदार पत्रकार राजू टपाल हे टिटवाळा येथे वास्तव्यास असून येथील एका स्थानिक वृत्तपत्रात टिटवाळा प्रतिनिधी म्हणून कार्यरत आहेत. दि. १० मे २०२५ रोजी सकाळी १२:०७ वाजता ते आपल्या राहत्या घरी असताना, मोबाईल नंबर 8108702974 वरून त्यांना एका अनोळखी इसमाचा फोन आला.

फोनवरील व्यक्तीने अत्यंत उद्धटपणे पत्रकार टपाल  यांना विचारले, "तू गॅंग रेपची खोटी बातमी का लावली?" असे म्हणत अश्लील शिवीगाळ केली. एवढ्यावरच न थांबता, "तुझ्या घरात येऊन तुला आणि तुझ्या फॅमिलीला संपवतो.अशी थेट जीवे ठार मारण्याची धमकी दिली.

या धक्कादायक प्रकारामुळे पत्रकारिता क्षेत्रात खळबळ उडाली आहे. पत्रकाराने लगेचच हा प्रकार कल्याण तालुका पोलीस ठाण्यात कळवला. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, भारतीय दंड संहिता २०२३ मधील कलम 351(4), 352 आणि 351(2) अंतर्गत तक्रार नोंदवण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत . या घटनेमुळे पत्रकारांच्या सुरक्षिततेबाबत गंभीर चिंता व्यक्त केली जात आहे. स्थानिक पत्रकार संघटनांनीही या प्रकाराची नोंद घेत तातडीने संबंधित आरोपीविरोधात कठोर कारवाईची मागणी केली आहे.

दरम्यान याबाबत अधिक चौकशी केली असता फोन करणारा इसम हा गॅंग रेप प्रकरणातील आरोपी शबनम शेख हिचा सायन जिटीबी नगर येथील राहणारा असल्याचे समजते तसेच या प्रकरणातील आरोपी शबनम शेख ही आपल्या भावाकडे लपून बसल्याचे कळते तर अन्य आरोपी मुंब्रा येथील पावले नामक व्यक्तीच्या घरी तर अन्य आंबिवली येथील आरोपीच्या घरी असल्याचे समजते.

30
Get In Touch

Dombivli

+91 9967872052

contact@shabdakhadag.in

Follow Us
लोकप्रिय बातम्या

Shabda Khadag © 2025. All Rights Reserved.

Developed By Vighnesh Technologies.