दुबईत भीषण अपघात; सात भारतीय कामगारांचा मृत्यू..

दुबईतील एमिरेट्स रोडवर एका मिनीबसने रस्त्याच्या मध्यभागी उभ्या असलेल्या ट्रकला धडक दिल्याने झालेल्या अपघातात ७ भारतीय कामगारांचा मृत्यू झाला असून नऊ जण जखमी झाले आहेत..

दुबई पोलिसांच्या वाहतूक विभागाचे संचालक ब्रिगेडियर जुमा सालेम बिन सुवैदान यांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, तांत्रिक बिघाडामुळे एक ट्रक अचानक रस्त्याच्या मध्यभागी थांबला होता. मागून येणाऱ्या मिनीबस चालकाचे लक्ष विचलित झाल्यामुळे आणि सुरक्षित अंतर न राखल्यामुळे या बसने ट्रकला पाठीमागून जोरदार धडक दिली.

या अपघातात सातजणांचा जागीच मृत्यू झाला तर नऊ जण जखमी झाले, त्यापैकी पाच जणांची प्रकृती चिंताजनक असून चार जण किरकोळ जखमी आहेत. सर्व जखमींना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या दुर्घटनेनंतर दुबईतील भारतीय दूतावासाने सोशल मीडियावरून तीव्र दुःख व्यक्त केले असून मृत कामगारांच्या कुटुंबाप्रती संवेदना प्रकट केल्या आहेत.

48

जाहिरात

ट्रेंडिंग बातम्या

Get In Touch

Dombivli

+91 9967872052

contact@shabdakhadag.in

Follow Us
लोकप्रिय बातम्या

Shabda Khadag © 2026. All Rights Reserved.

Developed By Vighnesh Technologies.